पांझराकाठ बचाव समिती 2015 साली स्थापन झाली. समितीने शासकीय स्तरावर केलेला पाठपुरावा. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी, महामहीम राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, धुळे जिल्हा पालक मंत्री, पाटबंधारे उपविभाग धुळे साक्री पिंपळनेर, तापी विकास महामंडळ धुळे जळगाव, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ धुळे, जिल्हा अधिकारी धुळे, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे जिल्हा परिषद धुळे, मा.कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग धुळे, मा.कार्यकारी अभियंता  मध्यम प्रकल्प विभाग क्र.1 धुळे, मा.तहसीलदार साक्री, भारतीय जल संस्कृती मंडळ औरंगाबाद, भारतीय जल संस्कृती मंडळ धुळे  देशबंधु, मंजु गुप्ता फाऊंडेशन धुळे , पिंपळनेर पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत पिंपळनेर या सर्वाना निवेदनाव्दारे ,पत्र व्यवहारा व्दारे व प्रत्यक्ष भेट देऊन पाठपुरावा करण्यात आला.

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कामाची दखल घेऊन शुभेच्छा दिल्या.


मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कामाची दखल


राज्यपाल

महामहीम राज्यपाल महाराष्ट्र शासन यांच्याशी टपालाव्दारे समीतीचे निवेदन…


जलसंपदा मंत्री

जलसंपदा मंत्री महाराष्ट्र शासन यांना समीतीने दिलेले निवेदन..

मा.गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री यांना समितिची भुमीका विषद करतांना समितीचे अध्यक्ष.

मा.गिरीश महाजन यांनी दखल घेऊन संबंधीत अधिकारी व विभागांना दिलेले आदेश..


धुळे जिल्हा खासदार सुभाष भामरे, नंदुरबारच्या खासदार हीनाताई गावीत, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांना समीतीची माहीती देतांना.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समितीचे माहीती देतांना.

महसुल मंत्री एकनाथ खडसेंना समितीची भुमीका विषद करातांना अध्यक्ष.

धुळे जिल्हा पालक मंत्री दादा भुसे यांना निवेदन देतांना.

मा.आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांना समितीची भुमिका विषद करतांना.

महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी समीतीची पार्श्वभूमी सांगतांना.

पांझरा व बोरी नदीवरील पूर नियंत्रण रेषा गुगल मॅप द्वारे आखनीचे काम सुरू व रेषा आखणीस सुरुवात.


धुळे जिल्ह्याची जीवनवाहिनी पांझरा नदी सह जामखेली, कान, बोरी नदीवरील पूर रेषा गुगल मॅप द्वारे आखण्यास सुरुवात झाली असून  यासाठी पांझरा काठ बचाव समिती पिंपळनेर यांनी सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला व हे समितीचे मोठे यश मानले जाते.पांझरा काठ बचाव समितीने 2015 पासून उगमापासून ते संगमापर्यंत पांझरा नदीकाठावरील बेकायदेशीर अतिक्रमण निघावे व पांझरा नदी श्वास मोकळा करण्यासाठी लढा उभा केला.यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री, जिल्हा अधिकारी पाटबंधारे विभाग ,धुळे तापी विकास महामंडळ जळगाव व स्थानिक ग्रामपंचायत सोबत पत्रव्यवहार करण्यात आला. वरील सर्व मान्यवरांनी याची दखल घेत  यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी या पूर नियंत्रण रेषे साठी 96 लाख रुपये मंजूर करून त्याचे टेंडर देखील काढले व गुगल मॅप द्वारे या नद्यांचा उगमापासून ते संगमापर्यंत सर्वेक्षणाचे नदीच्या दोन्ही बाजूला लाल पिवळी, हिरवी रेषा आखणीचे काम दिनांक 6/11/2019 पासून पांझरेच्या उगमापासून म्हणजेच शेंदवड भवानी तालुका साक्री जिल्हा धुळे येथून  सुरू झाले असून हे काम चेतक इंजिनियर्स पुणे हे करत असून याअंतर्गत पांझरा जामखेली, कान व बोरी नदीवरील रील गुगल मॅप द्वारे एवढ्या महिन्यात  हे काम पूर्ण होईल अशी माहिती चेतक इंजिनियर्सचे एम.व्ही.काकडे  यांनी दिली.         

याअंतर्गत महत्तम पुरेशा गुगल मॅप द्वारे लाल ,पिवळी, हिरवी रेषा आखण्याचे काम युध्द पातळीवर  सुरू आहे. 100 मीटर इंडिकेटर झोन  बनवण्यात  येईल व त्यामुळे कोण अतिक्रमणधारक आहे हे समजेल. लाल रेषा ही धोका, पातळी निळे रेषा ही इशारा पातळी तर पिवळी रेषा ही सक्तीची म्हणजे जनरल मानली जाईल. गुगल मॅप द्वारे पूर नियंत्रण रेषेचे काम पूर्ण झाल्यावर लाल रेषा म्हणजे धोका पातळी अंतर्गत येणाऱ्या या अतिक्रमण धारकांची ची यादी शासन स्तरावर करण्यात  येईल व त्याचा पाठपुरावा करून पांझरा काठ   बचाव समिती यासाठी आग्रही आहे. कारण पांझरा नदीचा श्वास या अतिक्रमण धारकांनी कोंडला असून हा श्वास मोकळा करण्यासाठी पांझरा कार बचाव समिती कार्यरत  आहे. पांझराकाठ  बचाव समितीने विविध उपक्रमाद्वारे जनजागृती उपक्रम राबविले आहेत यात मानवी साखळी द्वारे  जनजागृती निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा याद्वारे जनजागृती सुरू असते.     

पुर रेषा कशी आखतात. लाल रेषा 40 ते 50 वर्षात अतिवृष्टीने नदीचे पात्र निळी रेषा ही ओलांडते ज्यावेळी धरणातून 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणी पातळी जेथे पोहोचेल ती रेड लाईन म्हणजेच लाल लाईन म्हणून ओळखली जाते .    

निळी रेषा 20 ते 25 वर्षातून एखाद्या वेळेस नदीचे पात्र पांढरी रेषा ओलांडून ज्यावेळी धरणातून 60000 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल ती रेषा ब्ल्यू लाईन ओळखली जाते. 

क्युमेक म्हणजे काय? क्युसेक  मध्ये पाणी घण फुटामध्ये मोजले जाते क्युमेक मध्ये पाणी धन मीटरमध्ये मोजले जाते. एक क्युमेक पाणी म्हणजे प्रतिसेकंद 1000 लिटर पाणी .म्हणजेच 1000 क्युमेक या प्रमाणात पाणी सोडले जात असेल तर 1000 असे दहा लाख लिटर पाणी प्रतिसेकंद या वेगाने नदीपात्रात येत असते.

क्यूसेक म्हणजे काय ? धरणातून पाणी सोडताना पाण्याचे प्रमाण क्युसेक मध्ये मोजले जाते. एक घनफुट प्रती सेकंद म्हणजेच एक क्यूब पर सेकंद याचा अर्थ क्यसेक असा होतो.आता आपण पाहिले की एक घनफूट पाणी म्हणजे 28. 31 लिटर पाणी ज्यावेळी धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा निसर्ग केला जातो त्यावेळी 1000 28.31  असे 28310 लिटर पाणी प्रति सेकंदाला सोडले जाते. 24 तासात सतत 11500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर त्या धरणाची पातळी 24 तासानंतर एक टीएमसीने कमी झालेली असते.धरण साठ्यातील पाणीसाठा एम सी मध्ये मोजला जातो. धुळे जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांझरा नदी वर अक्कलपाडा यासारखे मोठे धरण आहे.व लाटीपाडा सारखा मध्यम प्रकल्प आहे.

 ठळक मुद्दे पांझरा काठ बचाव समिती या पुर रेषा नियंत्रण आखनीमुळे मोठे यश.

पांझरा, जामखेली ,कान ,बोरी नदीचा गुगल मॅप द्वारे पूररेषा आखणी सुरुवात.

लवकरच लाल रेषा म्हणजे धोका पातळी रेषा अंतर्गत येणाऱ्या अतिक्रमण धारकांची यादी शासनस्तरावर तयार होणार.

पुरेशा नियंत्रण आखण्यासाठी व विविध कामांसाठी शासनातर्फे 96 लाखाचा निधी मंजूर .

समिती विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करीत असते लवकरच पांझरा काठ बचाव समिती ही पांझरा परिक्रमा करणार असून याचा समारोप तापी संगमावर करण्यात येणार आहे अशी माहिती पांझरा काठ बचाव समितीचे अध्यक्ष मोतीलाल पोतदार ,रामकृष्ण एखंडे, योगेश्वर महाराज, प्राध्यापक पेटारे, भटू निकम ,हेमराज दसपुते ,पंकज भावसार,देवरे सर आदींनी दिली.

चला जाणूया नदीला’मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या पांझरा नदीचाही समावेश करावा या मागणीचे निवेदन पांझरा काट बचाव समितीचे अध्यक्ष मोतीलाल पोतदार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले.

‘चला जाणूया नदीला’ या अभियानात पांझरा नदीच्या समावेशासाठी प्रयत्न करावा. पांझरा नदीचा गुगल मॅपद्वारे पूर नियंत्रण रेषा सर्व्हे झाला आहे. तो तापी विकास महामंडळाकडे धूळखात पडला आहे. पूर नियंत्रण रेषा आखणीस गती मिळावी. पांझरा नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत अतिक्रमण होत आहे. चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत भात नदीचा समावेश झाला आहे. त्यानुसार जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या पांझरा नदीचाही समावेश करावा. त्यामुळे पांझरा विकासाला चालना मिळेल. पांझरा नदी बारमाही झाल्यास साक्री, धुळे व शिंदखेडा तालुका सुजलाम् सुफलाम् होईल असे जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

उत्तर महाराष्ट्र जल परिषद धुळे येथे दि १०/१२/२०२३ ,रविवार रोजी वेळ  दुपारी १२.३० वा धुळे येथे एक दिवसीय जल परिषद केशरानंद गॉर्डम येथे सपन्न

उत्तर महाराष्ट्र जल परिषदे धुळे येथील निवेदन दिले.