आपले पांझरा नदी विषयी, पांझरा काठ वाचावं समिती विषयी, व आपले काही वेगळ्या सूचना माहिती अनुभव आम्हाला प्रतिक्रिये द्वारे कळवा.
  1. खूप सुंदर आणि अर्थपूर्ण लेखन, Kedar! “जलसंवर्धन: आजची गरज, उद्याचा आधार” हा विषय अतिशय योग्य पद्धतीने मांडला आहे. आपल्या शब्दांमधून…

  2. माझा जन्म पिंपळनेर येथील सने06,/ 10/1958 असुन माझे वडिल व आजोबा व काका हे अर्ल पाचवीगल्ली मिरच्यांमारुती समोर रहात असतांनापाझरा…

49 Replies to “प्रतिक्रिया”

  1. नमस्कार
    मी पण पांझरा काठ वरील एक सामान्य नागरिक .प्रथम तुमचे अभिनंदन कुठं तरी खंत व्यक्त करायला एक मंच निर्माण केल्या बद्दल .अकलपाडा धरण पाण्याने भरण्यास सुरुवात झाली तशी मला माझ्या गावा बद्दल चिंता वाढायला लागली ,कारण दोन वर्षापूर्वी अति पावसाने माझ्या नेर गावात पाणी एका गल्लीत घुसले, आणि अंसाच एक दिवस येईल ज्यात वित्त व प्राण हानी होईल अंस मला सतत वाटतंय एक स्वंरक्षण भिंत असावी अंस मला वाटंत . अकलपाडा ते शेवट पर्यत जो नदीला घोल आहे तो फक्त नेर ला . दुसरे रेती उत्तखंलान चा प्रश्न ज्या मुळे पात्र खोल होत चालले आहे . प्रत्येक गावाचे सांड पाणी पंचायत ने नदी पात्रात सोडले आहे त्या मुळे ती सतत दुषित पाण्याचा नाला धुळ्यात बघायला मिळतो धन्यवाद

  2. पांझराकाठ बचाव समितीचे काम हे आता इंटरनेटवर सुरू झाले असुन त्यासाठी एक परीपुर्ण शास्रोक्त, ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक माहीती असलेले उत्तम संकेतस्थळ http://www.panzarabachav.in हे सुरू करण्यात आलेले आहे. हे संकेतस्थळ पाहतांना आपल्याला आपल्या पांझरामायबद्दल अनेक न माहिती असलेली माहिती मिळत जाते. आमचे मित्र आदरणीय श्री.मोतीलाल पोतदार सर व पांझराकाठ बचाव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या प्रयत्नास मनापासुन शुभेच्छा..!!
    प्रमोद गांगुर्डे. (ग्रामपचांयत सदस्य पिंपनेर. भाजपा पिंपळनेर संघट सरचिटणिस)

  3. छबिलदास दामोदर शेठ भामरे (विरदेल) says:

    समितीचे काम उत्कृष्ठ आहे

  4. नदी संवर्धनाचे काम उल्लेखनीय तसेच गरजेचे आहे..त्या साठी आपले खूप खूप अभिनंदन..! आपण करत असलेले कार्य असेच पुढे निरंतर सुरू राहो..या साठी हार्दिक शुभेच्छा..!

  5. पर्यावरणशील व उपक्रमशील व्यक्तीमत्व श्री. मोतीलाल पोतदार यांनी आयुष्यातील एक अविस्मरणीय व लोकहिताचं हे काम केलं आहे. त्यांचं मनापासून कौतुक व हार्दिक अभिनंदन…
    निबा मराठे (मराठा क्रांती मोर्चा धुळे,पत्रकार)

  6. आपल्या हिंदू संस्कृतीत नदीला मातेचा दर्जा दिला आहे, तेव्हा मातेची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. आणि श्री. मोतीलाल पोतदार यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

  7. अत्यंत स्तुत्य उपक्रम, श्री पोतदार सर व आपली संपूर्ण टीम आपण अभिनंदनास व कौतुकास पात्र आहात, अंतःकरण पुर्वक हार्दिक शुभेच्छा !!!

  8. अत्यंत स्तुतीपर व पर्यावरण पोषक व लोकहिताचा उपक्रम…श्री.मोतीलाल पोतदार आणि सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन….आणि पांझराकाठ बचाव समितीच्या सर्व उपक्रमांना आपल्याला यश प्राप्ती होवो ही शुभेच्छा….💐💐

  9. नमस्कार श्री मोतीलाल पोतदार सरांनी पांझरा बचाव चा उपक्रम अत्यंत उपयुक्त व जैवविविधता सांभाळण्यासाठी सर्वांनी ह्या उपक्रमाला पाठिंबा दिला पाहिजे ४० वर्षापूर्वीची पांझरा नदी व आजची स्थिती भयावह आहे जीव सृष्टीचा समतोल राखण्यासाठी शेंदवड ते मुडावद पर्यंतच्या पांझरा काठच्या गावांनी जागृत होऊन प्रथम नदीतला वाळू उपसा थांबवला पाहिजे तरच आपल्या जीवनदाहिनील आपण वाचवू शकतो व सर्व जीवसृष्टी व आपआपल्या गावांसाठी एक पवित्र कार्य आपल्या हातून घडो हिच प्रार्थना

  10. नदी संवर्धन ही आजच्या काळातील सर्वात निकडीची गरज आहे. नद्या वाचतील तरच पृथ्वी वरील जैविक सृष्टी टिकणार आहे.. पांझरा बचाव आंदोलना सारख्या उपक्रमातून अगदी लहानतील लहान नदी देखील तिच्या नैसर्गिक मार्गा प्रमाणे टिकली पाहिजे याची जाणीव करून सर्वांना करून दिली जाते.. हे आंदोलन खरं तर सर्वच नध्या न बाबतीत घडून यावं.. पांझरा काठ बचाव से अध्यक्ष आणि fuonder मोतीलाल पोतदार यांनी पांझरे चा उगमपासून विलया पर्यत चा अभ्यास करून शास्त्र शुद्ध उपाय सरकार समोर आणि काठा वरील जनते समोर ठेवलेत.. त्यांचं खूप अभिनंदन.. हे आंदोलन प्रत्येक गाव, खेड्या पर्यंत पोहचाव आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवा.. शुभेच्छा.. 🌹

  11. नदी संवर्धन काळाची गरज आपण स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.

  12. श्री सुनील वसंत कोठावदे माध्यमिक शिक्षक,वील्होळी,नाशिक says:

    मोतीलालजी पोतदार आपले व पांजरा काठ बचाव समिती चे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
    आपण हाती घेतलेला हा उपक्रम खूपच स्तुत्य व अभिनंदनीय आहे
    नद्या स्वच्छ व बारमाही वाहणारी आणि नद्या जोडणी झाली तर वृक्षलागवड ही होईल व शेती पण चांगली होईल आणि हवा व वातावरण व पाऊस पण छान होईल, म्हणून या उपक्रमात सर्व मानवजातीने सहभागी व्हावे व सहकार्य करावे.

  13. नदी हा मानवी जीवनाचा समृद्धीचा इतिहास दर्शवणारा विषय आपण हाती घेतला .. एक नदी की तरह है हम एक ही पानी को दोबारा नहीं छू सकते ,
    क्योंकि जो धारा बह चुकी है वह फिर कभी नहीं आएगी , नदी आणि नदीच्या पाण्याबाबत जनजागृती च्या उपक्रमासाठी आपल व आपल्या सहकारी बांधवांचे खुप खुप अभिनंदन👍

  14. सरजी,आपण करत असलेल्या उपक्रमाची खरोरखच सर्वाची गरज आहे. हे लोकहिताचे काम मित्रवर्य मोतीलाल पोतदार हे करत आहे. ते असं निरंतर चालू च राहो, व सरजी या कामासाठी खुप सा-या शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  15. श्री एस एस गायकवाड ( सेवानिवृत्त उपअभियंता साक्री पाटबंधारे उपविभाग ) says:

    पांजरा नदीच्या उगमापासून ते तिच्या पुढील प्रवासातील परिसराची अतिशय सुंदर माहिती या वेबसाईटमध्ये आहे. तसेच बरीचशी तांत्रिक माहिती सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे.
    श्री पोतदार साहेब आपले हार्दिक अभिनंदन व आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

  16. पुर्वी नदीला माता म्हणून संबोधले जाई कारण नदीमुळे सभोवतालचा परिसर समृद्ध होत होता .जेथे नदीचे संगोपन-संरक्षण आहे तेथे समृद्धता आहे .त्यामुळेच नर्मदा नदी या नर्मदामाता/ मैया संबोधले जाते. श्री मोतीलाल पोतदार यांचे नदी संवर्धन कार्य उल्लेखनीय आहे ते त्यादृष्टीने प्रयन्तशील आहेत ,त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  17. महेंद्र पोतदार, लोकमत कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा says:

    says:

    May 26, 2022 at 9:08 am

    कौतुकास्पद उपक्रम….
    पांझरा आईसाठी
    पांझराकाठ बचावचे अध्यक्ष श्री. मोतीलाल पोतदार यांनी पांझरेचा उगमपासून विलयापर्यतचा अभ्यास करून शास्त्र शुद्ध उपाय सरकारसमोर आणि काठावरील जनतेसमोर ठेवलेत व आपण केलेले कार्य खूपच गौरवास्पद आहे, असेच महानकार्य आपल्यातून होत रहावं अशा आपणास सदिच्छा व अभिनंदन..

  18. 🙏 सर,

    काहीतरी करा… जेणेकरून संपूर्ण नदीचे पूररेषा आखणी होऊन नदीचे संरक्षण होईल.

    व पांझरा नदी वाचेल….
    इजि.सदीप गांगुर्डे (गुगल मॅप द्वारा पुर रेषा आखणी प्रमुख चेतक इजि पुणे)

  19. आजच्या प्रदूषण ग्रस्त परिस्थितीत आरोग्य दृष्टया जल प्रदूषण संदर्भात आपल्या क्षेत्रातील पांझरा बचाव हा जनजागरण कार्यक्रम अतिशय आवश्यक असा आहे.या पाश्वभूमीवर पिंपळनेर जवळ ऊगमस्थान असलेल्या या जल मातेची आपण पत्रकार तसेच एक सूजाण नागरिक म्हणून घेतलेली दखल खरोखरच स्पृहणीय आहे. म्हणूनच तर जिल्हाचे खासदार श्री. सुभाष भामरे यांनी दखल घेत आपल्या या वेबसाईटचे उद्घाटन केले हे विशेष. आपल्या या उत्तम कामा बद्दल आपले मनापासून अभिनंदन व कौतुक. भविष्यात देखील देशोन्नतीची अशीच कामे व्हावीत या करीता शुभेच्छा सदिच्छा. जवळपास असतो तर आपल्या कडे निदान एक गुलाब पुष्प घेऊन आपले अभिनंदन व कौतुक केले असते.लांबून का होईना आपल्या प्रति माझ्या भावनांचा स्विकार करावा ही विनंती आर्जव आहे.लवकरच भेटीत प्रत्यक्ष बोलूच.

  20. मोतीलाल पोतदार सर आपले व आपल्या पूर्ण पांझरा काठ बचाव समितीचे अभिनंदन.

  21. आप्पासाहेब, ,प्रथम आपले हार्दिक अभिनंदन. कारण बरेच जण फक्त बोलतात .पण करत काहीच नाहीत. पण आपण प्रत्यक्ष कृतीत ऊतरलात. जल है तो कल है .हे तुम्ही जाणतात नदी हि आपली जीवन वाहीनी आहे तिला वाचविणे म्हणजेच जिवन वाचविणे आहे. मागच्याच वर्षी चाळीस गावात नदीतील अतिक्रमणांमुळे महापूर आला व फार मोठे नुकसान झाले.म्हणून नदी वाचविणे गरजेचे आहे.तरी हया मौलिक कामासाठी आपणास खुप खुप शुभेच्छा.

  22. पोतदार सर 🙏, आपले कार्य खूपच कौतुकास्पद आहे, गो.माता भारत माता,जल, पांझरा नदी प्रवाही साठी तुमच्या हातून भविष्यात असेच महान कार्य आपल्या हातून घडोत हिच शुभेच्छा

  23. पांझरा आम्हा सर्वांची जीवनदायीनी पांझरा बचाव या मोहीमेअंतर्गत आपण हाती घेतलेले कार्य हे संपूर्ण जिल्ह्य़ात एक चळवळ ठरावी जेणेकरून जलस्य जलं जीवनं ही संपदा सदैव आबाधीत रहावी जीव सृष्टी समतोल राखण्यासाठी आपला हा प्रवास अधिकाधिक फलश्रुतीमार्ग होवो 🙏🙏आपणास पुनश्च :शुभेच्छा
    राजेद्र दसपुते.
    (मुध्यापक पिंपळपाडा आश्रम शाळा)

  24. सर्व प्रथम तुमचे मनस्वी आभार….कि तुम्ही अतिशय संवेदनशील विषय घेतला आणि आपल्या जिव्हाळ्याची आणि आपल्या गावाची ओळख असलेल्या पांझरा नदीला वाचविण्याच्या चळवळीस प्रारंभ केला….!!!आपल्या पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा.

  25. छान कार्य सुरू केले पोतदार जी

  26. जलमित्र रमेश पोतदार. सेवानिवृत्त कृषी अधिकारी धुळे says:

    श्री मोतीलाल पोतदार
    आपण करीत असलेले काम अनंत जीवांचे कल्याण करणारे आहे पांझरा हि खान्देश विशेषतः धुळे जिल्ह्याची कळल्याने करणारी माता आहे पांझरा काठ वाचवणे हि खूप मोठी गरज आहे पूर नियंत्रण रेषा ओलांडून प्रचंड अतिक्रमण झाले आहे अनेकांनी गटारीचे व इतर उद्योगांचे सांडपाणी सोडले आहे पांझरा दूषित व घाण प्रदूषित केली आहे आहे प्रदूषणामुळे पाणी पिण्यालायक राहिले नाही पांझरा प्रदूषण मुक्त व साफसफाई करून केली पाहिजे आपले काम मौलिक व अमोल आहे. आपल्यासारखी लोकोपयोगी चळवळ करणारी जनकल्याणी व्यक्ती बोटावर मोजण्या इतकी हि राहिली नाही आपल्या. कामास त्रिवार सलाम. असाच जनकल्याण चा वारसा. सुरु राहो आपणास खूप खूप शुभेच्या

  27. नदी संवर्धन काळाची गरज आपण स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.

  28. नितिन कोतकर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहर says:

    सर्वांनी मिळून नदीत सोडले जाणारे गटारीचे सांडपाणी बंद करूया आणि नदीचे पावित्र्य राखुया

  29. जल ही जीवन है ! आपण हाती घेतलेले काम धुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला वरदान ठरणारे आहे . प्रिय मित्र रमेश व मोतीलाल जी पोतदार यांना मनःपुर्वक शुभेच्छा

  30. आपण स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद पांझरा नदीकाठी दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करावी यात आपणास लोकसहभागपंघेत येईल

  31. अतिशय ज्वलंत आणि महत्वाचा विषय आहे,ह्या विषयाची सुरुवात झाली पण व्याप्ती वाढत जाऊन जनमानसात पांझरा माता ही भावना रुजली पाहिजे म्हणजे तिच्याविषयी कृतज्ञता निर्माण होईल सेवाभाव आपोआपच वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न झाले म्हणजे आपसुकच हा सेवेचा प्रवास सुरू मातृत्वाचा भाव जागृत झाला पाहिजे. सर्वात महत्वाचे कचरा व्यवस्थापनासाठी पर्यत्न होऊन त्याच्यावर प्रक्रिया झाली तरच खऱ्या अर्थाने हे शक्य होईल.

  32. जलमित्र रमेश पोतदार. सेवानिवृत्त कृषी अधिकारी धुळे says:

    श्री मोतीलाल पोतदार यांनी पांझरा बचाव समिती द्वारा अत्यंत महत्वपूर्ण व सर्व सामान्य माणसाच्या जीवनात खूप उपयोगी पडेल असे हे काम केले आहे
    हे काम करायला खूप मेहनत चिकाटी मान अपमान सहन करून भारावून वेड्यासारखे कार्य करावे लागते त्यासाठी प्रचंड सयंम व मेहनत आणि अभ्यास हि लागतो शिवाय कष्टाचा पदरी असलेला पैसे हि लागतो तो पैसा खर्चाची दानत लागते
    संयम चिकाटी आणि वेडेपणा लागतो तो मोतीलाल पोतदार यांच्या अंगी आहे
    म्हणून तमाम निसर्ग प्रेमी पर्यावरण प्रेमी मित्रांकडून मनपूर्वक अभिनंदन !!
    मोतीलाल तुम्ही करीत असलेले काम जल व माती संवर्धन करणे हे आहे यातून पांझरा जिवंत राहणे ती स्वच्च राहणे हे आहे
    मोतीलाल हे काम भल्या भल्याना जमले नाही ते तू करतोस म्हणून तुझे अभिनंदन!!

    अनेकांनी देखावा म्हणून पांझरेचे काम हाती घेतले फोटो काढले बातम्या छापून आणल्या झाले काम असे केले त्यांनी राजकारण प्रसिद्धी यासाठी खटाटोप केला
    तू निराळा आहेस गेल्या पंधरा वर्षांपासून हे काम चिकाटीने करतो आहेस
    मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचे पर्यंत हे काम तू पोहचवलेस त्यासाठी केंद्रातून निधी मिळवण्याचा तुझा प्रयत्नास त्रिवार सलाम !!

    महाराष्टातून जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजणांकडून हि निधी आणला पूर रेषा आखून घेतली हे हि नसे थोडके
    तू खूप मूलभूत काम करतो आहेस तुझी नोंद इतिहासात होईलच !!
    तुझ्या निष्टेचा आणि तुझ्या कामाचा
    आम्हाला अभिमान आहे त्याही पेक्षा तू शिरूडचा सुपुत्र आहेस व जनकल्ल्यानासाठी झटतो आहेस याचा गर्व आहे
    तू rss पासून ते कार सेवक पर्यंत अत्यंत मनापासून सच्च्या दिलदार आणि जिवाभावाचा bjp चा सेवक आहेस याचा हि गर्व आहे
    पदाची पैश्याची प्रतिष्ठेची लालसा न करणारा सच्च्या सेवक आहेस तुला त्रिवार सलाम
    तुझ्या कार्यास शुभेच्छा सदा सर्वदा यशस्वी होशील हा आशीर्वाद !!

    जलमित्र रमेश पोतदार
    प्रभुदत्त उपासक धुळे

  33. निलेश दुसाणे (मेडिकल असोशियन . धुळे) says:

    हो… नानांनी लिहलंय ते मोतीलाल संदर्भात शब्दशः सत्य आहे… हा लष्कर च्या भाकरी भाजण्याचा उद्योग कुणाला निरर्थक वाटू शकतो.. तथाकथित मोठया व्यक्ती काही करू शकल्या नाही तिथे मोतीलाल काय करेल… पण आपल्या कडे ‘मांझी ‘सारखं उदाहरण आहे.. काळ उत्तर देईल की मोतीलाल च कामं कित्येक जीव वाचवणार ठरणार आहे, पर्यावरणा च्या रक्षणासाठी असंच मूलभूत काम करण्याची अवशकता आहे…. या साठी व्यक्ती निःस्वार्थी, प्रांजळ असावी लागते… मोतीलाल त्या सर्व गुणांनी परिपूर्ण आहे… मोतीलाल ला त्याच्या कामात उदंड यश मिळो आणि समाजाचं काळ्या साधलं जावं… शुभेच्छा 🌹🌹

  34. श्री.मोतीलाल सर आपले करावे तितके कौतुक कमीच आहे. तुमच्या या कार्यास सलाम…🙏🙏🙏 आपण करीत असलेल्या कार्यास व आपणास मन:पुर्वक शुभेच्छा..

  35. हेमराज जयस्वाल (नेहा मेडिकल धुळे) says:

    निलेश भाऊ, आपण मोतीलालच्या न भूतो न भविष्यती कार्याबद्दल खूपच छान विश्लेषण केले 👍👍
    मोतीलालच्या ह्या अती महान कार्याला माझा मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏

  36. मोती नाना ग्रेट वर्क👍
    🙏मूर्ती लहान किर्ती महान

  37. भामरे बापू(अहिराणी लेखक शिरपूर) says:

    प्रिय मोतीलालजी पोतदार साहेब,
    साक्षात दत्तप्रभुच्या पावन वरदहस्ताने पुणीत झालेल्या
    आदरणीय नानांजींनी तुम्हाला शुभाशिष दिलेले आहेत.
    त्यामुळे तुमच्या पांझरा काठ बचाव मोहीमेला खुप यश मिळणार आहे,
    तुमच्या वाढदिवसाला खुप खुप महत्व आहे.
    पांझरेचा प्रवाह वाहता राहावा म्हणून तुम्ही करत असलेल्या भगिरथ प्रयत्नांना प्रणाम,,
    सारे जग स्वार्थासाठी,सत्ता संपत्ती व प्रसिध्दी साठी झटत असतांना,
    तुम्ही प्रवाहाच्या विरुध्द दिशेने हे निःस्वार्थ समाजोपयोगी कार्य करत आहात,
    दूसर्‍यांसाठी व पुढच्या पिढीसाठी असे दूरदृष्टीचे काम करणारा माणूस म्हणजे समाजाचा धरोहरच..
    त्यासाठी या माणसाचे जगणे हे खरे जगणे आहे.
    तुमची निष्ठा ,तुमची चिकाटी व कार्यरत राहुन कार्याला न्याय द्यायची रीत वंदनीय आहे.
    तुमचे मधुर हास्य,
    तुम्ही वेळोवेळी करत असलेली विचारपुस,
    कुठेही भेटलात की गळाभेट करण्याचे अंतरिक प्रेम मला भावते.
    तुमच्यातला एक रसीक माणूस मी वेळोवेळी अनुभवतो,
    अशा या माझ्या मित्राला व व्याह्याला वाढदिवसाच्या व त्यांच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा💐💐💐

  38. महेद्र पोतदार (लोकमत सिंधूदुर्ग) says:

    🙏आदरणीय नानासाहेब
    श्री.रमेश पोतदार, जलमित्र, धुळे
    तसेच प्रिय Admin साहेब श्री.निलेश दुसाने, धुळे
    आपली प्रतिक्रिया खूपच सुंदर आणि जोरदार ठरली आहे. पांझरा काठ बचाव समितीचे अध्यक्ष, आमचे काकासाहेब आदरणीय श्री.मोतीलालजी पोतदार हे नात्याने जरी काका आहेत, त्याहून मित्र म्हणून प्रिय आहेत. काकांनी अत्यंत महत्वाचे म्हणजे सर्व सामान्य माणसाच्या जीवनात उपयोगी पडणारा ‘जल है तो, कल है’ , पाणी वाचवा, नद्या वाचवा, हा पांझरा काठ बचाव समितीद्वारे आंदोलने व वेगवेगळे उपक्रम सुरूच ठेवले आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधून या मोहिमेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे, आणि प्रचंड यशही मिळत आहे. श्री.मोतीलाल पोतदार ( काका ) यांच्या या कामास श्रेय आणि कौतुक दिलं पाहिजे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा…
    महेद्र पोतदार (लोकमत सिंधूदुर्ग)
    🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  39. खूप महत्वपूर्ण काम आपण हाती घेतलेत. या कामाचे अतिशय दूरगामी व चांगले परिणाम भविष्यात दिसतील. आपल्या या कार्याच्या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  40. पोतदार सर आपण छान कार्यक्रम हाती घेतला आहे.तो तुम्ही नक्कीच पुर्णत्वास नेनार हे फार मोठे काम आहे एखादया मोठया कामात बरेच लोक हातभार लावतात. एखादया व्यक्ति चा सिंहाचा वाटा असतो. पण ज्यांनी खरीचा वाटा ऊचलला आहे. अश्या लोकांचा विसर पडू देऊ नका म्हणजे बर होईल.

  41. दोस्त हो जल हेच जीवन आहें. म्हणून जगातील प्रत्येक संस्कृती हीं नदी काठी उमलली बहरली. उन्नत झाली. जगायला हवा, पाणी अन्न हे घटक अत्यावश्यक आहेत. हवा जागेवर मिळते अन्न तयार करावे लागते तर पाणी असेल तिथं जाऊन वसाहती उभ्या कराव्या लागतात. त्या असंख्य जल श्रोतातील एक श्रोत म्हणजे पांझरा नदी होय. हीं नदी 1970 पूर्वी खूप जल समृद्ध नदी होती. त्यावेळी मी धुळ्यातच शिकायला होतो. त्यावेळी पावसाळ्यांत मोठ्या पूलाला किमान 4/5 वेळा पाणी स्पर्श करत असे तर छोटा पूल प्रत्येक पावसाळ्यांत कोलमडून पडतं असे आणि हा पूल बऱ्याचदा 10 तें पंधरा दिवस पाण्याखाली राहात असे. गांधी पुतळ्या जवळून एक पाट गल्ली होती. तिथून एक पाण्याचा पाट तुडुंब भरून वहात असे. पांझरा साक्री, धुळे आणि शिंदाखेडा अशा टनतीन तालुक्याना जलसमृद्ध करत असे. धुळे सारखे शहर या पांझरा नदी मुळेच भरभराटीला आलं आहें. पण आता तें सर्व संपलं आहें. हीं नदी कोरडी ठाण पडली आहें. नदीच्या पात्रात गवत उगवलेल आहें. त्यामधून तूरळक पाण्याची धार आहें. गवतात जनावर चरत असतात. नदीच्या पत्रात अतिक्रमण झाली आहें. हीं नदी आता अखेरच्या घटका मोजत आहें. आणि तिच्या मृत्यू सरशी या तीनही तालुक्याचं वाळवंट होणार आहें.
    अशा मारणासन्न पांझरा नदी वाचविण्यासाठी पिंपळनेर येथील एक समाज सेवक मोतीलाल पोद्दार हे आपल्या मोजक्या सहकाऱ्यासह गेल्या 7 वर्षा पासून पांझारा बचाव मार्फत अनेक योजना राबवत आहेत. त्या मार्फत लोक जागृती आणून त्याना पांझरा नदी बारमाही करायचा प्रयत्न तें करत आहेत. याच योजनेचा एक भाग म्हणून त्यांनी पांझरा बचाव वेब साईड सुरु केली आहें. या वेबसाईडचे उदघाटनं नुकतेच धुळ्याचे खासदार आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मा डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आलें. याचा लाभ घेत सर्व पांझरा परिसरातील नागरिकांनी या पांझरा बचाव आंदोलनात सहभाग घ्यावा हीं विनंती.
    आपण विकास पाटील यांच्या नेतृत्वा खाली उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ मार्फत खान्देशच्या पाण्याचा लढा उभा केला आहें. किमच्या डोंगरा वरील नार पार नद्या पूर्व वाहिन्या करून गिरना, मोसम, बोरी, पांझरा या नद्या बारमाही कराव्या म्हनूनं आंदोलन सुरु केले आहें त्यात आपण पांझरा बचाव समितीलाही सहभागी करून घेतले आहें.
    …..बापूं हटकर……
    (उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ सदस्य)

  42. रामकृष्णा एखडेजी या कामात तुमच्या सारखे मित्रा मुळेच मला बळ दिल. पण यात तुमच्या सारखे मित्राचे सातत्य व वेळ दिला पाहिजे ही माफक अपेक्षा. मी प्रत्येक कार्यक्रमा वेळी आपणास कळवून देखील तुम्ही उपस्थीत नाही. त्यामुळे गैरसमज नसावा.

  43. पांझरा नदी बारमाही होण्यासाठी पोतदार साहेबांचे खूप छान काम आहे.
    उगमापासून संगममापर्यंत हि नदी स्वच्छ आणि बारमाही करणे हा आपला उद्देश आहे,तो लवकरात लवकर पूर्ण होवो.असं झालं तर हा उपक्रम म्हणजे देशासमोर “मॉडेल” तयार होईल….
    शुभेच्छा
    राहुल पंडितराव ठाकरे,
    मो,9405295897

  44. आमचे मित्र मोतीलालजी पोतदार यांचे निसर्गावर असलेले प्रेम व त्यांच्या माध्यमातून त्यांनी पांझरा बचाव संदर्भात केलेलं काम, स्वच्छ व सुंदर पांझरा नदी चे स्वप्न हे सर्व हळुहळू सत्यात उतरवताना करावी लागलेली मेहनत, धावपळ याचे सर्व श्रेय मोतीलाल पोतदार यांना जाते. त्यांच्या स्वप्नातील पांझरा सत्यात होवो याच शुभेच्छा.

  45. प्रकाश.विश्र्वनाथशेठ.सोनार.(मैद )धुळेकर says:

    माझा जन्म पिंपळनेर येथील सने06,/ 10/1958 असुन माझे वडिल व आजोबा व काका हे
    अर्ल पाचवीगल्ली मिरच्यांमारुती समोर रहात असतांनापाझरा नदित
    पोहायला जात असत तेव्हाहत्ती ढोहा जवळ आपल्या पाझरानदिचे
    सुंदर मनो रम्यदृष्य व पिण्याचे पाणीपुरविणारी अशी धुळेकराची.व पिंपळनेर शिंदखेडे साक्री वगैरे
    खडोपड्याचां ऊत्कर्ष व विकासरुपी माय गंगेला प्रत्येक नागरिकानी
    आप आपल्या परिवारातर्फे घान कचरा व दुषीत पाण्यांचे दूर उपयोग
    थांबविला पाहिजे.श्रीशुभाषदादा व पोतदार दांदानामाझा स.सहकार.
    पाठिंबा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *