पांझरा काठ बचाव समितीची वेबसाईट शुभारंभ माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार सुभाष भामरे यांचे हस्ते धुळ्यात करण्यात आला
पांझरा काठ बचाव समितेचे अध्यक्ष व भाजपा चे धुळे जिल्ह्या सरचिटणीस मोतीलाल पोतदार हे वेब साईटचे प्रसारनिर्माते आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जलमित्र रमेश पोतदार सेवा निवृत्त कृषी अधिकारी, भाजप चे जिल्हा संघटक किशोर सिंघवी व पत्रकार प्रशांत परदेशी उपस्थित होते.
खा. भामरे यांनी वेबसाईटचे उदघाटन जाहीर केले यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि पांझरा हि खान्देशची जलवाहिनी व संजीवनी आहे भाजप सरकारचे वेळी मोतीलाल पोतदार यांनी पाठपुरावा करून जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचेकडून 1कोटी रुपये सर्वेक्षणासाठी मंजूर करून घेतले पांझराचे सौरक्षण संवर्धन झाले पाहिजे जातं करून पांझरा बारमाही वाहिली पाहिजे नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला पाहिजे काठच्या लोकांनीही पांझरा आईची काळजी घेऊन स्वच्छता राखली पाहिजे पांझराकाठ बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना घेऊन देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची भेट घडवून आणेल व केंद्रातून भक्कम निधी मिळवून देईन असे सांगून शुभेच्छा दिल्यात
लवकर समिती दिल्लीत खा. सुभाष भामरेंच्या नेतृत्वात मोदी साहेबांची भेट घेतील व पांझरा बचाव कार्य पुढे नेतील असे मोतीलाल पोतदार यांनी सांगितले.
यावेळी वेब साईट निर्माते, इंजि. केदार अहिरराव यांनी सखोल माहिती दिली पांझरा काठ बचाव समिती गेल्या 2015 पासून कर्यरत आहे पांझरा वाचावी यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेत असते जनजागृतीचे काम म्हणून काठावरच्या शेतकऱ्यांना. व जनतेला आणि पर्यावरण प्रेमींना एकत्र कार्यक्रम घेतले आहेत निबंध स्पर्धा व्याखणेही समितीने घेतली आहेत पुढे पांझरा परिक्रमा आयोजित केली आहे https://panzarabachav.in/
वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन मोतीलाल पोतदार यांनी केले आहे.
छायाचित्र















