“पाण्यासाठी दशदिशा , फिरविसी दशदिशा”…….!!

सजीव सृष्टी जगवायची असेल तर जल ,जंगल ,जमीन, जन वाचले तर सजीव श्रुष्टी वाचेल. यासाठी प्रत्येकाने नद्या वाचविने, जल स्त्रोत्र सुरक्षित करणे ही काळाची गरज आहे. याचसाठी  पांझरकाठ बचाव समितीने धुळे जिल्ह्याची प्राणदायनी, जीवनवाहिनी हरित खानदेश करणारे मंत्र तंत्र चालवीणारी पांझरा, कान, जामखेलि, बोरी यांच्या काठावर प्रवाहात अतिक्रमण  तर काहींनी घान टाकून या पेय जलात विष पेरण्याचे काम केले. ते दूर करण्यासाठी पांझराकाठ बचाव समितीने 2015 पासून पुढाकार घेतला आहे. याचे पुढचे पाऊल टाकून या पांझरेच्या रुपात गंगा पुजणात निर्मल पाणी प्रत्येक घरात, शेत, शिवारात, जन-जनावरास अमृत प्राशना लायक होईल यासाठी हा लढा विविध माध्यमान द्वारे लढण्यासाठी कायिक ,वाचिक ,माणसिक या पेक्षाही ‘धनिक , पैशाची’ सहकार्याची मदत हवि आहे. पांझरेच्या गंगा पूजनाचे पूण्य पदरात पाडून आपण आर्थिक सहकार्य करुन या लढ्यास योगदान देऊ शकतात. यासाठी समाजातील दानशुर व्यक्ति , संघटना, सामाजीक ,राजकीय अशा विविध घटकांनी मदत करावी असे आव्हान करण्यात येत आहे. या मदतीमुळे पांझराकाठ वरील विविध अतिक्रमने काढून पांझरेचा मूळ प्रवाह मोकळा करणे व पांझराकाठा वरील 160 किमीचा परिसर वनरायिने शुशोभित करुन पांझरेचा श्वास मोकळा करुन ‘पांझरा  बारामाहि करणे’ , ‘ पांझरा, कान, जामखेली,बोरी ‘ या नद्या नदी जोड प्रकल्पाशी जोडने व पांझरेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी समिती दक्ष आहे.

 वृक्षवन , जल, जंगल, जमीन…..!!!

पांझरेच्या काठी वाढवूया आपले जनजीवन पांझरेच्या पाण्यावर करूया… !!!

या साठीच आपल्या सर्वांची आर्थिक, सामाजिक, राजकीय मनोबलाची समितीला आवश्यकता आहे.   

आपण वरील कोणत्याही मदतीसाठी समितीचे अध्यक्ष मोतीलाल भिवसन पोतदार , सटाना रोड पंचमुखी कॉर्नर , महात्मा फुले कॉलोनी प्लॉट नं.21 पिंपळनेर, ता. साक्री जि. धुळे ( महाराष्ट्र ) पिन कोड – 424306यांच्याशी संपर्क करावा.मोब नं. 9405814662

पांझरा काठ बचाव समिती!


आपण सुमारे 15 वर्षा पूर्वी पिंपळनेर येथे काही सहकाऱ्याना सोबत घेऊन पांझरा काठ बचाव समिती स्थापन केली. तेंव्हा पासून आपण सतत पांझरा नदी वाचविण्यासाठी वेग वेगळ्या पातळीवर काम करीत आहोत. त्याची थोडक्यात माहिती अशी, पांझरा व बोरी नदीवरील पूर नियंत्रण रेषा गुगल मॅप द्वारे आखनीचे काम सुरू व रेषा आखणीस सुरुवात.

धुळे जिल्ह्याची जीवनवाहिनी पांझरा नदी सह जामखेली, कान, बोरी नदीवरील पूर रेषा गुगल मॅप द्वारे आखण्यास सुरुवात झाली असून यासाठी पांझरा काठ बचाव समिती पिंपळनेर यांनी सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला व हे समितीचे मोठे यश मानले जाते.
पांझरा काठ बचाव समितीने 2015 पासून उगमापासून ते संगमापर्यंत पांझरा नदीकाठावरील बेकायदेशीर अतिक्रमण निघावे व पांझरा नदी श्वास मोकळा करण्यासाठी लढा उभा केला.यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री, जिल्हा अधिकारी पाटबंधारे विभाग ,धुळे तापी विकास महामंडळ जळगाव व स्थानिक ग्रामपंचायत सोबत पत्रव्यवहार करण्यात आला. वरील सर्व मान्यवरांनी याची दखल घेत यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी या पूर नियंत्रण रेषे साठी 96 लाख रुपये मंजूर करून त्याचे टेंडर देखील काढले व गुगल मॅप द्वारे या नद्यांचा उगमापासून ते संगमापर्यंत सर्वेक्षणाचे नदीच्या दोन्ही बाजूला लाल पिवळी, हिरवी रेषा आखणीचे काम दिनांक 6/11/2019 पासून पांझरेच्या उगमापासून म्हणजेच शेंदवड भवानी तालुका साक्री जिल्हा धुळे येथून सुरू झाले असून हे काम चेतक इंजिनियर्स पुणे हे करत असून याअंतर्गत पांझरा जामखेली, कान व बोरी नदीवरील रील गुगल मॅप द्वारे एवढ्या महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती चेतक इंजिनियर्सचे एम. व्ही. काकडे यांनी दिली.

याअंतर्गत महत्तम पुरेशा गुगल मॅप द्वारे लाल ,पिवळी, हिरवी रेषा आखण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. 100 मीटर इंडिकेटर झोन बनवण्यात येईल व त्यामुळे कोण अतिक्रमणधारक आहे हे समजेल. लाल रेषा ही धोका, पातळी निळे रेषा ही इशारा पातळी तर पिवळी रेषा ही सक्तीची म्हणजे जनरल मानली जाईल. गुगल मॅप द्वारे पूर नियंत्रण रेषेचे काम पूर्ण झाल्यावर लाल रेषा म्हणजे धोका पातळी अंतर्गत येणाऱ्या या अतिक्रमण धारकांची ची यादी शासन स्तरावर करण्यात येईल व त्याचा पाठपुरावा करून पांझरा काठ बचाव समिती यासाठी आग्रही आहे. कारण पांझरा नदीचा श्वास या अतिक्रमण धारकांनी कोंडला असून हा श्वास मोकळा करण्यासाठी पांझरा कार बचाव समिती कार्यरत आहे. पांझराकाठ बचाव समितीने विविध उपक्रमाद्वारे जनजागृती उपक्रम राबविले आहेत यात मानवी साखळी द्वारे जनजागृती निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा याद्वारे जनजागृती सुरू असते.

पुर रेषा कशी आखतात?
लाल रेषा 40 ते 50 वर्षात अतिवृष्टीने नदीचे पात्र निळी रेषा ही ओलांडते ज्यावेळी धरणातून 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणी पातळी जेथे पोहोचेल ती रेड लाईन म्हणजेच लाल लाईन म्हणून ओळखली जाते .
निळी रेषा 20 ते 25 वर्षातून एखाद्या वेळेस नदीचे पात्र पांढरी रेषा ओलांडून ज्यावेळी धरणातून 60000 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल ती रेषा ब्ल्यू लाईन ओळखली जाते.

धुळे जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांझरा नदी वर अक्कलपाडा यासारखे मोठे धरण आहे.व लाटीपाडा सारखा मध्यम प्रकल्प आहे.
ठळक मुद्दे पांझरा काठ बचाव समिती या पुर रेषा नियंत्रण आखनीमुळे मोठे यश.
पांझरा, जामखेली ,कान ,बोरी नदीचा गुगल मॅप द्वारे पूररेषा आखणी सुरुवात.
लवकरच लाल रेषा म्हणजे धोका पातळी रेषा अंतर्गत येणाऱ्या अतिक्रमण धारकांची यादी शासनस्तरावर तयार होणार.
पुरेशा नियंत्रण आखण्यासाठी व विविध कामांसाठी शासनातर्फे 96 लाखाचा निधी मंजूर.

समिती विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करीत असते लवकरच पांझरा काठ बचाव समिती ही पांझरा परिक्रमा करणार असून याचा समारोप तापी संगमावर करण्यात येणार आहे अशी माहिती पांझरा काठ बचाव समितीचे अध्यक्ष मोतीलाल पोतदार ,रामकृष्ण एखंडे, योगेश्वर महाराज, प्राध्यापक पेटारे, भटू निकम, हेमराज दसपुते ,पंकज भावसार, देवरे सर आदींनी दिली.

पांझरा खोऱ्यातील सर्व लाभधारक बंधू भगिनींना विनंती आहे की, आपणही या जलयात्रेत सहभागी होऊन, आपला जल लढा तीव्र करा. त्याशिवाय शासन प्रशासन आपली दखल घेणार नाही. सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत आहे असंही नाही. पण सरकारी तिजोरीत जेवढा पैसा आहे त्यापेक्षा जास्त खर्चाच्या योजना वाट बघत असतात. या सर्वच योजनांना एकाच वेळी पैसा देणं शक्य नसते. मग अशा वेळी सरकार ज्या भागातील लोक जास्त ओरडतात त्यांना आधी निधी देत. जे गप्प बसून वाट पाहतात त्यांच्या वाट्याला काहीच येत नाही.

आता आपल्या सोबत उत्तरामहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, संचालित उत्तर महाराष्ट्र खान्देश जल परिषद संपूर्णत शक्तीनिशी उतरली आहे. सर्वश्री विकास पाटील सर, बापूसाहेब हटकर, ए जी आप्पा पाटील, एन एम भामरे सर, भिला पाटील, योगेंद्र जुनागडे, लीलाधर दुसाने ही सर्व मंडळी सर्वशक्तीनिशी या लढ्यात उतरली आहे. त्यांनी आता पर्यंत नंदुरबार ते नाशिक पर्यंत 4 व्हर्च्युअल रॅली काढल्या आहेत. या रॅलीना, केंद्रीय मंत्री ना भारतीताई पवार खासदार उन्मेष पाटील, खा हेमंत गोडसे, आमदार अनिल भाईदास पाटील, आ माणिकराव कोकाटे तसेच नदिनांगरणी योजनेची प्रणेते मोतीलाल पाटील, प्रा एच एम पाटील आणि बरीच जल तज्ञ मंडळी हजर होती.

एक गोष्ट सर्वानी लक्षात घ्या. कोणतीही लढाई जोपर्यंत जन आंदोलनाचं स्वरूप घेत नाही तो पर्यंत तिला यश येत नाही. स्व भाऊसाहेब हिरे यांनी खान्देशच्या जल आंदोलनाची जी लढाई सुरू करून ठेवली आहे, ती जिंकून आपण विजयी होत नाही तो पर्यंत आपला लढा सुरू ठेवा! आपण पांझरा वाचवू शकलो नाही तर येत्या काही काळात खान्देशच वाळवंट झाल्या शिवाय राहणार नाही. या वाळवंटात निपजणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ़ करणार नाहीत!

हर जोर जुल्म के टक्कर मे,
संघर्ष हमारा नारा है।

खान्देशमा एकज वारा।
जित्ती ठेवा भो पांझरा!

मोतीलाल पोतदार
अध्यक्ष- पांझरा काठ बचाव समिती.

खातेधारकाचे नाव: मोतीलाल भिवसन पोतदार
बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक (SBI)
खाते क्रमांक: 34101777752
आयएफएससी(IFSC)कोड:SBIN0011154