पांझराकाठ बचाव समिती पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे ही 2015 पासून कार्यरत असून पांझरेच्या उगमापासून ते संगमापर्यंत अतिक्रमण व पांझरेची गटारगंगापासून वाचविण्यासाठी व श्‍वास मोकळा करण्यासाठी पांझराकाठ बचाव समिती विविध उपक्रम राबवित असते. त्याअंतर्गत भव्य खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
निबंध स्पर्धेतील विषय–

1) माझ्या स्वप्नातील बारमाही पांझरा व पांझरा बारमाही होण्यासाठी शासन यंत्रणा व जनतेचा सहभाग

2) धुळे जिल्ह्यातील जलसंपदा आणि त्यात पांझरेची संस्कृती सामाजिक भौगोलिक योगदान,

3) उगमापासून संगमापर्यंत पांझरा बचावासाठी शासकीय व अशासकीय स्तरावर उपायोजना

4) पांझरा खोऱ्यातील प्राचीन जल व्यवस्थापन व पीक पद्धती व सध्याच्या पांझरा खोऱ्याची स्थिती असे विषय देण्यात आले होते.यात खुप स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. आठ स्पर्धकांना बक्षीस देण्यात आलेत.

बक्षिस वितरण सोहळा.

पारितोषिक–

प्रथम- 2100 रू.रोख ,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र

द्वितीय-1500रू.रोख,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र

तृतीय-1100रू. रोख,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ-500रू रोख,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र

जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम आमदार सौ.मंजुळा गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रतिष्ठित व्यापारी भालचंद्र ततार यांच्याअध्यक्षतेखाली घेण्यात आला.या स्पर्धेत विरदेल शिंदखेडाचे छबिलाल दामोदरदास भामरे यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय पारितोषिक  म्हसदीचे प्रा.संजय वेडू सूर्यवंशी यांना देण्यात आले. तर तृतीय पारितोषिक वलवाडीच्या अनिता पोपट पाटील यांनी पटकावले. या विजेत्याना आमदार सौ.मंजुळा गावित व भालचंद्र ततार, हर्षल विभांडीक यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ दोन बक्षिसे कु.किरण रवींद्र सत्तेजा शिरपूर, सोनाली प्रशांत  कोतकर, पिंपळनेर, तर विशेष उत्तेजनार्थ बक्षीस ग्रामसेवक पंकज हिराजी पगारे(पिंपळनेर ) , प्राचार्य डाॅ.भगवान सोनवणे, (वलवाडी) व विशाल  बेनुस्कर पिंपळनेर यांना डाॅ.तुळशिराम गावित, संभाजीराव अहिरराव, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांच्या हस्ते देण्यात आले. सर्व विजेत्याना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व मानाचे वस्र स्व.सौ.शोभाताई भालचंद्र ततार यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. पांझराकाठ बचाव समिती दर्जेदार व संशोधनात्मक विश्लेषणात्मक निबंधांचे संकलित स्वरूपात पांझरा काठ बचाव समितीचे अध्यक्ष मोतीलाल पोतदार, सौ.उज्ज्वला पोतदार, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राम पेटारे यांनी केले. स्पर्धेतील निबंधाचे परिक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार रमेश दाणे , कृषी अधिकारी रमेश पोतदार व पिंपळनेरचे पत्रकार राजेन्द्र गवळी  यांनी केले. यावेळी आमदार मंजुळा गावित, हर्षल विभांडीक, डाॅ.तुळशिराम गावित, संभाजीराव अहिरराव, परिक्षक राजेन्द्र गवळी, यांनी मनोगत व्यक्त केले.