पांझरा काठ बचाव समितीचे हंगामी कार्यक्रम
” पांझरा बोरी नदीच्या काठावरील गावांची परिक्रमा “
पांझरा, कान, जामखेली, बोरी या नद्यांच्या उगमा पासून ते संगमा पर्यंत या काठावरील गावांची परिक्रमा आयोजित करण्याचा मानस आहे. यासाठी “पांझरा रथ ” तयार करून यावर पांझरा, बोरी या नद्यांचा जलकलश ठेवणे. पांझरे वरील अतिक्रमणे व तिचा मूळ प्रवाह या नदी वरील धरणे, तलाव, बंधारे, कालवे आदींची अवस्था दुरावस्था यात साचलेले गाळ यासाठी जनजागृती करणे.
गूगल मॅप द्वारे झालेल्या लाल, पिवळी, हिरवी रेषेचा सर्व्हे तापी विकास महामंडळा कडे धूळ खात पडला आहे. त्याला तातडीने गती देण्यासाठी पांझरा काठा वरील मोठ्या लोकवस्तीच्या गावांना सभा, संमेलने, मेळावे, जनजागृती करणे. गुगल मॅप द्वारे झालेल्या सर्वेची अतिक्रमण धारकांची शासनाने यादी जाहीर करावी यासाठी आक्रमक भूमिका घेणे. नदीच्या काठांच्या मोठ्या लोकवस्तीच्या गावाला संरक्षण भिंत बांधने व काठ सुशोभित करणे व या गावांमध्ये समित्या स्थापन करणे व या अपरिक्रमेकची सुरुवात उगमा पासून करून ही परिक्रमा साक्री, शिरपूर, शिंदखेडा, धुळे शहर, धुळे तालुका, असा १६० किमीचा प्रवास करून या सर्व परिक्रमेत पत्रके वाटणे.
पांझरेचा भौगोलीक, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय यावर छोटीशी शॉर्ट फिल्म ( डॉक्युमेंटरी ) दाखवणे व या पांझरेच्या परिक्रमेचा समारोप जेथे तापी आणि पांझरेच संगम होतो त्या कपालेश्वर येथे समारोप करून धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर परिक्रमेचा इतिवृत्तांतचे निवेदन देऊन प्रसार माध्यमाशी संपर्क करून या परिक्रमेचा समारोप करण्याचा मानस आहे.
धुळे शहरात पांझरा काठावर विद्यार्थ्यांची मानवी साखळी द्वारे जनजागृती करणे, शालेय स्थरावर भव्य अशी चित्रकला स्पर्धा आयोजित करणे असा मानस समितीचा आहे.
